🌸 स्वागत संदेश 🌸
खामगाव ग्रामपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायतीची कामे, ताज्या सूचना, जाहिराती व उपलब्ध सुविधा याबाबतची अद्ययावत माहिती घरबसल्या व पारदर्शक पद्धतीने मिळावी हा या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे.
खामगाव ग्रामपंचायत सदैव गावकऱ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असून, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, महिलांचे सक्षमीकरण व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
ही वेबसाईट गावकऱ्यांना माहितीचे व्यासपीठ देण्यासोबतच प्रशासनाशी संपर्क व संवाद साधण्याचे दुवा ठरेल. प्रत्येक नागरिक हा गावाच्या विकासाचा भागीदार आहे, याची जाणीव ठेवून “आपला सहभाग – आपला विकास” या सूत्रावर ग्रामपंचायत कार्यरत आहे.
“स्वच्छ, हरित व प्रगतिशील खामगाव” हा आपला ध्यास असून,
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपला सहकार्य, सूचना व सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.
– खामगाव ग्रामपंचायत